सत्तेबाहेर असतानासुद्धा साहित्य, कला, नाट्य या क्षेत्रांशी जर संबंध टिकवून ठेवले, तर राजकीय प्रवासाची आडवळणं सहज पार करता येतात, असा माझा अनुभव आहे. साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं भरवावीत किंवा नाही या विषयावर चर्चा नेहमीच रंगत असतात; पण महाराष्ट्राला लाभलेल्या पंढरीच्या वारीइतकंच या संमेलनांचं चिरंजीवित्व अव्याहत राहील, याबाबत मला विश्वास आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पिंपरी-चिंचवड इथं दिमाखदार पद्धतीनं नुकतंच पार पडलं. आपल्या मायबोलीशी असलेलं माझं नातं अधिक पक्कं करण्यासाठी मला साहित्य संमेलनात सहभागी होणं मनापासून आवडतं. दरवर्षी भरणाऱ्या या साहित्य संमेलनात मला गेली काही वर्षं तर सातत्यानं सहभागी होता आलं आहे. राजकारण आणि निवडणुका यांपलीकडंही व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांशी आपण बांधील असलं पाहिजे, हे मी फार पूर्वीपासून मी माझ्या मनात पक्कं ठरवलं होतं. संमेलनाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं साहित्यिक, वाचक, समीक्षक, प्रकाशन संस्था असे अनेक घटक एकत्र येतात आणि नव्या विचारांचा आणि प्रवाहांचा धांडोळा समोर येतो. प्रत्येक दशकात साहित्याचे संदर्भ बदललेले असतात. एरवी आपल्या मनातसुद्धा येणार नाही, अशा सामाजिक विचारांवरचं भाष्य ऐकायला मिळतं.
आपल्या मायबोलीसाठी या संमेलनातून संस्कृती जतन करणं आणि परिवर्तनसाठी याचा योग्य वापर करणं हे आपल्याला साध्य करता येऊ शकतं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगली पुस्तकं वाचण्याचा हा मग नित्याचा भाग होऊन जातो. चांगलं लिहिता यायला हवं व चांगलं वाचता यायला हवं आणि त्याचबरोबर चांगलं मराठी बोललंही पाहिजे हे धडे मला बारामतीच्या प्राथमिक शाळेतच मिळाले. दुसरी-तिसरीच्या वर्गात असताना आमचे शिक्षक होते वाघमोडे मास्तर. ते पाठीत धपाटे घालत घालतच शिकवत. शिक्षा करण्याची त्यांची पद्धतही वेगळी होती. ते विद्यार्थ्यांची मानगूट आपल्या हाताच्या मुठीत घट्ट पकडायचे. मग मान वाकवून ती बाकावर ठेवायचे आणि पाटीत धपाटे घालायचे. चुकीचं मराठी बोलल्यावर अशी शिक्षा मिळायची. गंमत म्हणजे स्वतः मास्तरांचं मराठी मात्र अस्सल गावरान होतं! आम्हाला मारताना त्यांची दमदाटी सुरू असायची ः ‘वंगाळ मराठी बोलू नगंस!’ मराठीचे असे धडे गिरवत माझी वाटचाल सुरू होती. इयत्ता सातवी-आठवीपासून शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि स्नेहसंमेलनाची जबाबदारी माझ्यावर सोपवली जायला लागली. प्रत्यक्ष अभ्यासात मात्र फारसा रस नसायचा. शाळेमध्ये वेगवेगळ्या विषयांमध्ये ‘माला’ असायच्या. ही पुस्तकं सुबोध आणि सोप्या भाषेत असायची. त्या वेळचे आमचे शिक्षक कलंदर अमीन शेख ही पुस्तकं स्वतःच्या खर्चानं आणून आम्हाला वाचायला लावायचे. ते उत्तम शिकवत असत. त्यांना कला आणि साहित्याची नुसती गोडीच होती असं नाही, तर त्या विषयांची फार चांगली समजदेखील त्यांना होती. ते स्वतः फार उत्तम नट होते, दिग्दर्शक होते. त्यांनीच आम्हा मुलांवर कला, रंगभूमी, साहित्य हे संस्कार केले. आमच्या कोवळ्या मनाची मशागत केली. त्याच वेळी आमच्या शाळेतल्या शिक्षिका नीलांबरी वाटवे यासुद्धा इतर अनेक विषयांची पुस्तकं आम्हाला वाचायला देत असत. या नीलांबरीबाई म्हणजे प्रसिद्ध भावगीतगायक गजाननराव वाटवे यांच्या पत्नी. अशा या शिक्षकांमुळंच माझी वाचनाची सवय वृद्धिंगत होत गेली. इथून सुरू झालेला साहित्यप्रवास अखंडपणे चालू ठेवता आला, याचं मला फार समाधान वाटतं. नंतरच्या काळात पुण्यात महाविद्यालयातसुद्धा हा क्रम पुढं चालत राहिला.

पिंपरी-चिंचवडमधल्या मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांची मुलाखत ऐकण्यात श्रोते रंगून गेले होते.
आमच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये (बीएमसीसी) विख्यात नाटककार शं. गो. साठे हे प्राध्यापक म्हणून आम्हाला लाभले. तेच सर आम्हाला कॉलेजमध्ये अकाउंटन्सी शिकवत; पण त्याशिवायही आम्हाला साठे सरांकडून पुष्कळ काही शिकायला मिळालं. साहित्य, कला, नाट्य या विषयांत त्यांना आस्था होती आणि ते या विषयांचे जाणकारही होते. भाषेकडं लक्ष दिलं पाहिजे, असं मला साठे सरांमुळंच प्रकर्षानं जाणवू लागलं. कसदार मराठीची मोहिनी मला पडली याला कारण आमचे हे साठे सरच. त्यांचं ‘ससा आणि कासव’ हे नाटक त्या काळी अतिशय गाजलं. कॉलेजात असताना नाटकात काम करण्याचाही योग आला होता. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात मी श्यामचं काम केलं होतं. इतरांची नाटकं पाडण्याचा उद्योग आम्ही उत्साहानं करायचो. एकदा सगळ्यांनी मिळून माझंही नाटक छान पाडलं! साहित्यिक, नाटककार, विचारवंत, कलाकार, दिग्दर्शक, गायक, वादक या सर्वच क्षेत्रांतल्या अनेकांशी माझे स्नेहबंध पुढच्या काळात वाढत गेले. सामाजिक जाणिवांच्या विषयांबरोबरच साहित्य, कला, नाट्यक्षेत्रांतल्या मुशाफिरीचा फायदा मला सत्तेवर असताना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नेहमीच झाला आहे. त्याचबरोबर सत्तेबाहेर असतानासुद्धा या क्षेत्राशी संबंध जर टिकवून ठेवले, तर राजकीय प्रवासाची आडवळणं सहज पार करता येतात, असा माझा अनुभव आहे.
साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं भरवावीत किंवा नाही या विषयाच्या चर्चा नेहमीच रंगत असतात; पण महाराष्ट्राला लाभलेल्या पंढरीच्या वारीइतकंच संमेलनांचं चिरंजीवित्व अव्याहत राहील, याबाबत मला विश्वास आहे.
------------------------------------------------------------------
आमच्या बीएमसीसीमध्ये विख्यात नाटककार शं. गो. साठे हे आम्हाला प्राध्यापक म्हणून लाभले. तेच सर आम्हाला कॉलेजमध्ये अकाउंटन्सी शिकवत; पण त्याशिवायही आम्हाला साठे सरांकडून पुष्कळ काही शिकायला मिळालं. साहित्य, कला, नाट्य या विषयांत त्यांना आस्था होती आणि ते या विषयांचे जाणकारही होते. भाषेकडं लक्ष दिलं पाहिजे, असं मला साठे सरांमुळंच प्रकर्षानं जाणवू लागलं.