विकास बारामतीचा
कॉलेज शिक्षण संपून शरदराव बारामतीला घरी परतले आणि १९६३सलि महाराष्ट्रात दुष्काळ पडला. बारामती तालुका दुष्काळी तालुकांपैकीच १ होता. नदी, नाले, विहिरी आतून गेल्या. पिण्याच्या पाण्यासाठीही आटापिटा करावा लागत असे. गोरगरिबांची उपासमार होऊ लागली. शरदरावांनी सरकार दरबारी प्रयत्न करून रेशन दुकानातून स्वस्त धन्य उपलब्ध करून दिले. परंतु लोकांकडे त्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी रस्त्याची कामे सुरु केली. दुष्काळावर मत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा विचार ते करू लागले. आपण जर पाणी अडवले आणि ते साठून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवली तरच दुष्काळाला तोंड देऊ शकू हे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी तेथे ‘युनेस्कोची फूड फॉर हंगर’ हि योजना राबवली जात होती. या योजनेत गरिबांना धान्य आणि पाम ऑईल दिले जात असे. शारदरावांनी त्यांच्या उनेस्कोच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन तेथील अधिकारऱ्याना विचारले “हे सर्व तुम्ही फुकट का देत आहात? ‘फूड फॉर हंगर’ हे आम्हाला अपमानास्पद वाटते. त्यैएवजि ‘फूड फॉर वर्क’ आशी योजना करा.” संचालक त्यांना म्हणाले ‘ तुम्ही हि योजना बारामतीत राबून दाखवा.’ शरदरावांनी ते आव्हाण स्वीकारले.
गावकऱ्यांच्या श्रमातून आणि मिशनच्या अर्थ सहाय्यातून ‘तांदुळवाडी’चा पहिला पाझर तलाव आकारास आला. पाझर तलावाच्या कामात येणार्यांना मजुरी म्हणून रोज ३ किलो गहू आणि आठवड्याला १ लिटर ऑइल देण्यात आले. ६ महिन्यात काम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसाळ्यात तलाव पूर्ण भरला. नंतर आसपासच्या परिसरात असे 300 तलाव बांधले गेले. ज्यादा पाणी वाहून नेन्यासाठी वेस्ट-वे करायला राज्य शासनाची मदत मिळवली.
शरदरावांनी बारामतीत ‘कृषी प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या मार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक ज्ञान देण्यात येऊ लागले. सावकाराच्या तावडीतून गरीब शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी ‘शेती विकास संघ-बारामती’ स्थापन झाला. त्याच्या मार्फत ट्युबवेल्स खोदण्यासाठी सेंट्रल बँकेकडून कर्ज मिळवण्यात आले. किर्लोस्कर कंपनीकडून सवलतीच्या दारात ऑइल इंजीन्स व पाणी खेचण्याचे पम्प शेतकऱ्यांना मिळून दिले. शेतीवर आधारित दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, वराहपालन असे जोड धंदे सुरु केले. संकरीत जनावरे पैदास केंद्र सुरु केले. १९६३साली बारामतीला शेतकरी परिषद भरवली. तिच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. शरदरावांचा गौरव करताना ते म्हणाले, ‘ज्या पद्धतीने शारद्रवान्सारखे तरुण पुढे येतात व कामे करतात, ते पाहिल्यवर मला उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चिंता राहिली नाही.’
नंतर शरदरावांनी अमेरिकेकडून जंगलवाढीसाठी मोठे आर्थिक साहाय्य मिळवले आणि काही वर्षातच उजाड माळराने आछादित झाले. फळबागा व उसाचे मळे निर्माण झाले. आप्पासाहेब पवार यांनी परदेशात जाऊन मिळवलेले शेतीविषयक ज्ञान बारामतीच्या विकासाला उपयुक्त ठरले. राहुरी कृषी विद्यापीठाने शेतीस संशोधनासाठी आप्पासाहेबांना डॉक्टरेट दिली. किर्लोस्कर, महेंद्र, गोयंका या उद्योगपतींनी बारामती परिसरात कारखाने सुरु केले. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले. अनेक बेकार तरुण स्वावलंबी झाले. तंत्रशाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, स्रियांसाठी कॉलेज, वसतिगृहे अश्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. माळेगाव सहकारी कारखाना, दुध डेअरी, भाताच्या गिरण्या यांनी बारामती तालुका गजबजला. फिरता दवाखाना सुरु झाला. शरदरावांनी बारामतीचा मोठ्या प्रमाणात कायापालट केला.