व्यक्तिमत्वाचे विविध पैलू
जागतिक मराठी परिषदेची स्थापना करून त्यांनी जगभरातील मराठी माणसे एकत्र केली. ‘यशवंतराव चौहान प्रतिष्ठाण’ हि राजकारण विरहित संस्था आहे. तिथे मराठी व इंग्रजी ग्रंथांचा उत्तम संग्रह आहे. चित्रपट, नाटक, कला, साहित्य, लावणी, तमाशा अशा विविध क्षेत्रातील कलावंतांचा तेथे सन्मान केला जातो. विविध क्षेत्रातील प्रश्नांवर तेथे चर्चा केली व परिसंवाद होतात. वेगवेगळ्या पक्षाचे व मताचे व्यक्ती तिथे एकत्र येतात. स्वतः शरद पवार बहुश्रुत असून त्यांना साहित्य-संगीत-कला व संस्कृती यात रस आहे. समाजाच्या भौतिक व वैज्ञानिक प्रगतीत तर त्यांना रस आहेच पण समाजाचे सांस्कृतिक जीवनही समृद्ध झाले पाहिजे असे त्यांना वाटते. उत्तमोत्तम ग्रंथांची मराठी भाषांतरे वाचकांना उपलब्ध व्हावीत, असे त्यांना वाटते. शास्त्रीय व सुगम संगीत त्यांना खूप आवडते. त्यांच्या प्रेरणेने ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ’ आणि ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ निघाले आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह अफाट आहे. बारामतीचा तर त्त्यांनी कायापालट केला आहे. शेतकी, फळबागा, पाझर तलाव याच्यासोबत एम.आय.डी.सी., विद्या प्रतिष्ठाण अश्या संस्थांमार्फात विकास झाला आहे. तेथे मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, मराठी व इंग्रजी माध्यमाचे पब्लिक स्कूल, महाविद्यालय, माहिती-तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इंजिनिअरींग वगैरे शिक्षणाच्या सोयी, फिरता संगणक अशा अनेक सोयी उपलब्ध आहेत. मागील पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग १का कार्यक्रमात म्हणाले होते कि- ‘पवार यांनी बारामतीत जसा कायापालट केला आहे तसे देशातील प्रत्तेक गाव आणि शहराचे झाल्यास भारत आपोआपच प्रगत होईल.’ समाजाविषयीच्या तळमळीमुळे आणि नेतृत्वगुणांनमुळे शरद पवारांनी हे करून दाखवले आहे.
ते ज्या-ज्या संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्या-त्या संस्थेची प्रगती कशी होईल याचा आराखडा ते तयार करतात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, नेहरू सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, रयत शिक्षण संस्था, बॉम्बे क्रिकेट असोसीएशन, विद्या प्रतिष्ठान, कृषिविकास प्रतिष्ठाण, कोजेन इंडिया आशा विविध संस्थानचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थांचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी व्हावा असा त्यांचा कटाक्ष असतो. ते इतर राज्यात किंवा परदेशात जातात तेंव्हा अद्ययावत ज्ञान व माहिती घेऊन येतात आणि तिचा उपयोग आपल्या संस्थामध्ये करतात. ते दिल्लीत जरी असले तरी त्यांचे महाराष्ट्रावर सतत लक्ष असते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या राज्याचे आणि देशाच्या ज्ञान अद्यावत कसे राहील यासाठी त्यांची सतत धडपड चालू असते. गवोगावच्या कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील माणूस भारावून जातो. आपल्या भेटीला येणाऱ्या प्रत्तेकाचे म्हणणे ते शांतपणे आईकून घेतात आणि मगच मतप्रदर्शन करतात. त्यामुळे ते लोकप्रिय आहेत. विविध पक्षातील नेत्यांशी तसेच कलाकार, साहित्यिक व वैज्ञानिक त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.