क्रीडाप्रेम
कबड्डी, खो-खो या मराठमोळ्या खेळांची प्रगती त्यांच्यामुळे झाली. मल्लविद्येला आणि कुस्तीगीरांना त्यांनी उत्तेजन दिले. ते स्वतः गोल्फ उत्तम खेळतात. पुण्यातील बालेवडीची ‘श्री छत्रपती क्रीडानगरी’ त्यांच्यामुळे उभी राहिली. मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी वानखेडे स्टेडीयममध्ये सुधरणा केल्या. तिथे ‘क्रिकेट इंडिया’ची नवीन भव्य वास्तु उभी केली. ‘वांद्रे-कुर्ला संकुल’ निर्माण केले. उपनगरातील क्रिकेटप्रेमींना कांदिवली, मुलुंड येथेही छोट्या छोट्या अकादमी सुरु केल्या. निवृत्त खेळाडूंना त्यांनी निवृत्ती वेतन सुरु केले. माजी खेळाडूंचे निवृत्ती वेतन वाढवले. ते भारतीय क्रिकेट संघटनेनंतर आंतरराष्ट्रीय संघटनेचे (आयसीसी) अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला अधिक उत्तेजन मिळाले.
 
Top