कृषी
२००९ ते २०१४ या कालवधीत शरद पवार कृषिमंत्री होते ,या वेळी सरकारने "एफडीआय'संदर्भात घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला. ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून घेतला. पवार साहेबांनी मात्र या निर्णयाचे समर्थन केले. "एफडीआय'मुळे शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे अधिक पडतील असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा होता. कृषिमंत्री या नात्याने शरद पवारांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक चार टक्क्यांपर्यंत वाढली. अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी ठरले. भारताचा शेतकरी पवार साहेबांना मसीहा मानतो. शेती पिकली तर शेतकऱ्याचे व देशाचे नशीब पिकेल, यात शंका नाही.