महिलाविषयक धोरण व मंडल आयोग
मंडल आयोगाची अंबलबजावणी करून ५२ टक्के इतर मागासवर्गीय समाजाला व्ही.पी.सिंह यांच्यानंतर शरद पवारांनी सामाजिक न्याय मिळून दिला. त्यांनी सर्व इतर मागास पुढारी, भटक्या विमुक्तचे पुढारी यांना मंत्रालयात बोलावले आणि भटक्या-विमुक्तासाठी स्वतंत्र जागा ठेवण्याचा निर्णय घेतला. मंडल आयोगाची अंबलबजावणी झाली. ७३वि घटना दुरुस्ती करून इतर मागासवर्गीयांना स्थानिक स्वराज संस्थेत प्रतिनिधित्व दिले. त्याचवेळी महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला. हिंदू कोड बिलातील दुरुस्तीमुळे सर्व भगिनी भावंडाच्या वडिलोपार्जित संपत्तीत वाटेकरी झाल्या. पुरोगामी विचारांच्या शरदरावांनी स्त्री-पुरुष समानता, सर्व जातींना संधी हे विचार प्रत्यक्षात आणले. महात्मा फुले, डॉ.आंबेडकर यांची पुस्तके अल्प दारात जनतेला उपलब्ध करून दिली. श्रेष्ठ समाजसुधारकांच्या जीवन-विचारांवर परिश्रमपूर्वक चित्रपट काढले. एस.एम.जोशी, पु.ल.देशपांडे, कुसूमाग्रज अश्या व्यक्तींवरील चित्रपट ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान’ संस्थेकडून पूर्ण करून घेतले. यशवंतराव चव्हाणांना ते कधीही विसरले नाहीत. चव्हाणांच्या निधनानंतर कृतज्ञ भावनेतून त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान’ हे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारले.