विधायक कार्य
शरदरावांनी पुण्याचे ‘महात्मा फुले’ यांचे स्मारक राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्याचा भव्य कार्यक्रम समता परिषदेच्या वतीने केला. १९८० सालच्या सुमाराला पुलोदचे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव विधीमंडळाने एकमताने संमत केला होता. आता त्याची अंबलबजावणी करण्याचा निर्णय शरदरावांनी घेतला. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामकरण करायचे ठरवले. 14 जानेवारी १९९४ रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी नांदेडच्या वेगळ्या विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता दिली आणि त्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव द्यायची घोषणा केली. त्याचवेळी मराठवाड्यातील जनतेने व विद्यार्थ्यांनी मराठवाड्यात कोठेही तणाव निर्माण होऊ देऊ नये, समाजाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, असे आव्हान त्यांनी केले. ‘नामांतर’ हा शब्द न वापरता त्यांनी मुस्त्तेगीरीने ‘नाम विस्तार’ असा शब्द वापरला.बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसैनिकांना कोणालाही झळ लागता कामा नये असे बजावले. मराठवाड्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
 
Top