१
व्यक्तिमत्व
राजकारण आणि समाजकरणाच्या माध्यमातून
केवळ राज्य नव्हे केंद्रीय पातळीवर एक आदरणीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच
शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आपला एक ठसा उमटवला आहे. कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, शांतपणा, विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप
पेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टी या व्यक्तीमत्त्व गुणांच्या
जोरावर पवार साहेबांना 'काटेवाडी ते मंत्रालय' हा मोठा पल्ला अल्पावधीत
गाठता आला.
देशाच्या राजकारणात,समाजकारणात आणि संस्कुतिक क्षेत्रात १९६० नंतर नवी पिढी पुढे आली या पिढीचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते शरद पवार , राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवार साहेबांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. त्यामुळेच शरद पवारांच्या रुपात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने एक क्रीडाप्रेमी, आधुनिक नेता अनुभवास आला आहे.
देशाच्या राजकारणात,समाजकारणात आणि संस्कुतिक क्षेत्रात १९६० नंतर नवी पिढी पुढे आली या पिढीचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते शरद पवार , राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पवार साहेबांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. त्यामुळेच शरद पवारांच्या रुपात संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने एक क्रीडाप्रेमी, आधुनिक नेता अनुभवास आला आहे.
शरद पवार यांचा जन्म
१२ डिसेंबर २०१५ रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील 'काटेवाडी' या छोट्याशा गावात झाला. गोविंदराव आणि आई शारदाबाई या शेतकरी कुटुंबातील
जन्मलेल्या शरद पवार यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू शारदाबाई पवार
यांच्याकडून मिळाले.शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे जिल्ह्यातील
स्थानिक राजकारणात कार्यरत होत्या. गोविंदाराव हेदेखील सहकारी चळवळीतील निष्ठावंत
कार्यंकर्ते होते. तसेच त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अशा
कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय-सामाजिक कार्याची जडणघडण झाली. त्यामुळेच
शरद पवार यांचा 'कॉलेज जीएस (जनरल सेक्रेटरी)ते महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री व विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री' हा खडतर प्रवास थक्क करणारा तर आहेच या शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा
देणारा आहे.
बारामती येथील
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचे शालेय शिक्षण झाले.
पुढे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय शिक्षण घेतानाही त्यांनी जनरल
सेक्रेटरी (जी.एस) म्हणून महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर नेतृत्त्व केले. या
काळात शरद पवार यांचा युवक कॉंग्रेसशी संबंध आला आणि तेथून त्यांनी पक्षीय
राजकारणात प्रवेश केला.
पवार साहेबांचा राजकीय,सामाजिक प्रवास पुस्तकरुपी
सर्वश्रुत आहे, परंतु इंटरनेटवर साहेबांविषयी असलेली माहिती अत्यल्प आणि अपुरी आहे
त्या दृष्टीकोनातून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत
साहेबांची माहिती पोहोचविण्यासाठी शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर
आम्ही आपल्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री
शरद पवार यांची यांच्या जीवनप्रवासाविषयी माहिती ह्या वेबसाईट आणि Android App च्या माध्यमातून
देत आहोत.
राष्ट्रवादी-कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेस एक तपापासून दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखला
जातो. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचेच निर्णय घेतले जातील आणि
त्यांची अंमलबजावणी होईल याकरीता राष्ट्रवादी पक्ष सदैव प्रयत्नशील राहिला आहे.
सत्ता ही समाजाच्या भल्यासाठी वापरावी, सामान्य जनतेला सत्तेचा आधार वाटावा ही
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण पक्षाने अंगी बाणली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकारणाच्या माध्यमातून भारताच्या
प्रगतीमध्ये हातभार लावण्यास मदत करणारा मंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष आदरणीय पवार साहेब नेहमीच ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ह्या मा. यशवंतराव
चव्हाण ह्यांच्या शिकवणीप्रमाणे वागत आले आहेत. त्याच शिकवणीवर राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष उभा राहिलेला आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना धरून लोकशाहीच्या मार्गावर, पक्ष सर्वांना
विकासाच्या दिशेने घेऊन जात आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देणे आणि
सामाजिक समतेसाठी फुले-शाहू आंबेडकरांनी घालून दिलेल्या मार्गाने आपण गेली चौदा
वर्षे वाटचाल करीत आहोत.
१९९९ मध्ये पक्ष स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राच्या विकासात पक्षाने खूप
मोठा हातभार लावला आहे. महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी
राबवलेल्या योजनांचा लाभ राज्यातील सर्व लोकांना झालेला आहे. राष्ट्रवादीच्या
मंत्र्यांनी शिक्षणाच्या आणि रोजगार क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे.
जनतेला शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात स्वायत्तता देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या
मंत्र्यांकडून सतत केला जातो. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात देशाच्या
प्रगतीचे धेय्य ठेवून पक्षाचे कार्यकर्ते सतत काम करत असतात.
मा. शरद पवार साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक गोरगरीब शेतकऱ्यांना आणि
मच्छीमारांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे. दुसऱ्याच्या शेतात राबणाऱ्या अनेक
शेतमजुरांना, दलित
समाजातील, भटक्या आणि विमुक्त जमातीतील आणि इतर दलित
शेतमजुरांसाठी अनेक लोकांना सक्षम बनविण्यासाठी अनेक खास योजना मा. पवार साहेबांनी
लागू केल्या आहेत.
राष्ट्रवादी पक्षाची खरी ताकद जर कोणती असेल तर महाराष्ट्राच्या
खेड्यापाड्यांत आणि वाडी वस्तीपर्यंत कार्यरत असलेले पक्षाचे कार्यकर्ते. आपल्या
लोकांशी सतत संपर्कात असणारे, त्यांच्या सुःख दुःखात त्यांना साथ देणारे, अडिअडचणीला
धवपळ करणे मदत करणारे अशीच आपल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांबाबत लोकांच्या मनात
भावना आहे. आणि याच जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादी
पक्ष निवडून येतो आहे.
नेतृत्व –
नेतृत्व
अनेक वर्षांच्या कामांतून आणि अथक परिश्रमांतून घडते. त्याच्या आयुष्यात रात्रंदिवस युद्धाचे
प्रसंग येतात. अग्निपरीक्षेत उत्तीर्ण झालेले नेतृत्व हे
स्वयंसिद्ध आणि स्वयंप्रकाशित असते. लोककल्याणासाठी सातत्याने झटणारा नेताच लोकमानसात
उतरतो, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. शरद पवार यांचे नेतृत्व हे लोकमानसात
पूर्णपणे मुरलेले नेतृत्व आहे. असा नेता सत्तेवर असला काय
किंवा नसला काय, तो
लोकांच्या विळख्यातच असतो. तो आपली नाळ लोकांपासून तुटू देत नाही. लोकांच्या नाडीवर बोट ठेवून तो लोकांशी संवाद साधतो. पवार साहेबांचा लोकसंपर्क रावांपासून
रंकांपर्यंत आहे. लोकशाहीत लोकसंग्रह हीच खरी
संपत्ती असते.
गेल्या चाळीस वर्षांपासून उभा महाराष्ट्र साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहतो आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी कामांचा डोंगर रचला आणि कर्तृत्वाचा सह्याद्री उभा केला. त्यांची बांधिलकी वरवरची नाही. बांधिलकी कलम करता येत नाही, हे यशवंतराव चव्हाणांनी एका ठिकाणी म्हटले आहे. ती मुळातूनच उगवावी व वाढावी लागते. शरद पवारांच्या राजकारणाला समाजकारणाचा आशय प्राप्त झालेला आहे. राजकारण हे साधन असते आणि असले पाहिजे, समाजकारण हे साध्य असते, या गोष्टीचे भान या नेत्याला आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून उभा महाराष्ट्र साहेबांच्या नेतृत्वाकडे पाहतो आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी कामांचा डोंगर रचला आणि कर्तृत्वाचा सह्याद्री उभा केला. त्यांची बांधिलकी वरवरची नाही. बांधिलकी कलम करता येत नाही, हे यशवंतराव चव्हाणांनी एका ठिकाणी म्हटले आहे. ती मुळातूनच उगवावी व वाढावी लागते. शरद पवारांच्या राजकारणाला समाजकारणाचा आशय प्राप्त झालेला आहे. राजकारण हे साधन असते आणि असले पाहिजे, समाजकारण हे साध्य असते, या गोष्टीचे भान या नेत्याला आहे.
मा. शरद पवार साहेबांनी मा. यशवंतराव चव्हाण
ह्यांच्याकडून समाजकारणातून राजकारणाचे धडे शिकून राजकारणात प्रवेश केला. १९६७ सालात पहिली
आमदारकीची निवडणूक लढवून ते निवडून आले आणि आज केंद्रीय स्तरावर एक अतिशय हुशार
आणि लोकप्रिय नेता म्हणून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व त्यांनी निर्माण केलेले आहे.
एक विद्यार्थी नेता म्हणून मा. शरद पवार साहेब
महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावर कार्यरत होते.ह्या प्रक्रियेत त्यांचा युवक
कॉंग्रेसशी संबंध आला व त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
आपल्या राजकीय कारकीर्दीत निव्वळ राजकारणच
नव्हे तर शिवाय साहित्य, अन्य कला, क्रीडा, समाजसेवा,उद्योग, पत्रकारिता आदी
क्षेत्रांतील दिग्गजांशी, मान्यवरांशी, अभ्यासकांशी त्यांचा जवळून
संबंध आला. ह्या सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांनी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध
प्रस्थापित केले.
अवघ्या २६-२७ व्या वर्षी मा. पवार साहेब आमदार
झाले. १९७४ मध्ये ते मंत्री झाले, आणि १९७८ मध्ये वयाच्या
केवळ ३८ व्या वर्षी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. १९७८, १९८८ , १९९०, १९९३ असे चार वेळा त्यांनी
विविध कालावधीसाठी मुख्यमंत्रीपद सांभाळले. दरम्यान केंद्रीय संरक्षण खात्याची
जबाबदारीही त्यांनी सांभाळली. २००९-२०१४ सालात त्यांनी भारताचे कृषीमंत्रीपद
भूषविले.
मा. पवार साहेबांची शेतकऱ्यांच्या नेता म्हणून
एक वेगळी ओळखही आहे. ते महाराष्ट्राबरोबर देशाच्या शेतकऱ्यांचेदेखील फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहेत.
भारतीय शेती जागतिक स्तरावर जाऊन एक महत्वाचा स्पर्धक व्हावा हे त्यांचे उद्दिष्ट
आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, मग ते जैवतंत्रज्ञान असो
की माहिती तंत्रज्ञान, त्याचा पवार करण्यास ते कायमच
प्राधान्य देत आले आहेत. केवळ फलोद्यानच नाही तर कुकुटपालनातही महाराष्ट्र
राज्याचे नाव व्हावे ह्यासाठी विविध कंपन्यांना त्यांनी प्रोत्साहित केले आहे.
अनेक रोगांपासून पशूंचे संरक्षण व्हावे ह्यासाठी जागृती निर्माण करण्यावर भर दिला.महाराष्ट्रात
जलस्वराज्य आणि आर्थिक स्वयंपूर्णता आणण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले आहेत.
माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ, फळबाग विकास योजना, महाराष्ट्रात सहकार
क्षेत्राचा विकास, साखर कारखाने क्षेत्रातील योगदान, मुंबईतील दंगली, किल्लारी
भूकंप या संकटांनंतर हाताळलेली परिस्थिती, महिला आरक्षण विषयातील
भूमिका व निर्णय, माहिला बचत
गटांना प्रोत्साहन देण्याचे धोरण, राज्यातील वंचित
घटकांसाठीचे त्यांचे धोरण ह्या सर्व धोरणांचे श्रेय मा. पवार साहेबांनाचेच आहे.
ह्या सर्वांबरोबरच महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवा म्हणून स्थानिक स्वराज्य
संस्थेत महिलांना ५०% आरक्षण मिळण्यासाठी मा. पवार साहेबांनीच पुढाकार घेतला होता.
अन्न सुरक्षा विधेयक पारित करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.
मा. पवार साहेबांचा आतापार्यांचा राजकीय प्रवास
हा विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या
धोरणी आणि पुरोगामी राजकीय शैली यामुळेच त्यांना “जाणता राजा” म्हणून
संबोधले जाते.