शरद पवारांचा ५०वा वाढदिवस



शरद पवारांचा ५०वा वाढदिवस १९९० साली मोठ्या प्रमाणावर पुण्यात साजरा करायचा आणि त्या जाहीर सभांचे अध्यक्षस्थान समाजवादी नेते व विचारवंत नानासाहेब गोरे यांनी स्वीकारायचे असे ठरवून सत्कार समिती स्थापन करण्यात आली.

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार होते. त्यावेळीही हा वाढदिवस साजरा करायचा, असे लोकांनी उस्पुर्तपणे ठरवले होते.अधिवेशन कला १२ डिसेंबरला  मुख्यमंत्री शरद पवार सभागृहात आले तेंव्हा सर्व सदस्यांनी बाके वाजून त्यांचे स्वागत केले. विरोधी पक्षनेते शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी शरद पवारांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला. आपल्या भाषणात ते म्हणाले-‘ हिंदुस्तानच्या राजकारणात पवार स्वत:चे स्थान निर्माण करतील याबद्दल शंका नाही.

जनता दलाचे निहाल अहमद, शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव धोंडगे, सभापती मधुकरराव चौधरी, विधान परिषदेचे सभापती जयवंतराव टिळक आश्या मान्यवर नेत्यांची गौरवपर भाषणे झाली.

आपल्या भावनाप्रधान भाषणात शरद पवारांनी सत्काराला उत्तर दिले- ‘अनेक लोकप्रतिनिधींकडे कर्तुत्व असते. [परंतु त्यांना संधी मिळत नाही. मात्र मला चांगली संधी व अनुभव मिळत गेला. फुले-आंबेडकर, पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक, वसंतदादा, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या विचारवंतांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात भिन्न भिन्न मतांचे लोक सामाजिक बंधीकली मानून एकत्र येतात. हि बांधिलकी ठेउनच देशाच्या सेवेसाठी अखेरपर्यंत काम करण्याचे अभिवचन मी देतो,’ असे विचार त्यांनी व्यक्त केले.

नागपूरला झालेल्या जाहीर सत्कार समारंभात काश्मीरचे फारूक अब्द्दुला, शे.का.प.चे गणपतराव देशमुख, भा.ज.प.चे अरुण अडसर यांनी गौरवपर भाषणे केली. त्या समारंभाला अनेक खाजदार, आमदार, पत्रकार, उद्योगपती व कार्यकर्ते उपस्थित होते. त्या नंतरच्या काळात शरद पवारांच्या विरुद्ध वातावरण तापल्यानंतर नानासाहेब गोरे यांनी पुण्यातील सत्कार समारंभाचे अध्यक्षपद स्वीकारू नये, अशा सूचना येऊ लागल्या. पं नानासाहेब गोरे यांनी म्हणाले कि- ‘ व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडे असले पाहिजेत. महाराष्ट्रामध्ये शरद पवारानंएवढा खंबीर कर्तबगार नेता दुसरा नाही, म्हणून आपले हेवेदावे विसरून प्रत्तेकाने शुभेच्छा द्यायला हव्यात.’ दुर्दैवाने तो समारंभ रद्द झाला. पं महाराष्ट्रातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रातून आणि नियात्कालीकामधून पवारांना शुभेच्छा दिल्या. त्यामद्धे नानासाहेब गोरे, मोरारजी देसाई, वसंतराव साठे, के.पी.साळवे, बाळासाहेब भराडे, बॅरिस्टर अंतुले, सुशीलकुमार शिंदे, नरुभाऊ लिमये, अहिल्या रांगणेकर, हुसेन दलवाई, दत्ता सामंत, विद्याधर गोखले अशी विविध क्षेत्रातील व वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी होती.

विधायक कार्य
शरदरावांनी पुण्याचे ‘महात्मा फुले’ यांचे स्मारक राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्याचा भव्य कार्यक्रम समता परिषदेच्या वतीने केला. १९८० सालच्या सुमाराला पुलोदचे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव विधीमंडळाने एकमताने संमत केला होता. आता त्याची अंबलबजावणी करण्याचा निर्णय शरदरावांनी घेतला. ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नामकरण करायचे ठरवले. 14 जानेवारी १९९४ रोजी मकरसंक्रातीच्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला. त्यांनी नांदेडच्या वेगळ्या विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीला मान्यता दिली आणि त्या विद्यापीठाला स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव द्यायची घोषणा केली. त्याचवेळी मराठवाड्यातील जनतेने व विद्यार्थ्यांनी मराठवाड्यात कोठेही तणाव निर्माण होऊ देऊ नये, समाजाच्या संपत्तीचे नुकसान करू नये, असे आव्हान त्यांनी केले. ‘नामांतर’ हा शब्द न वापरता त्यांनी मुस्त्तेगीरीने ‘नाम विस्तार’ असा शब्द वापरला.बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसैनिकांना कोणालाही झळ लागता कामा नये असे बजावले. मराठवाड्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

महिलाविषयक धोरण व मंडल आयोग  
मंडल आयोगाची अंबलबजावणी करून ५२ टक्के इतर  मागासवर्गीय समाजाला व्ही.पी.सिंह यांच्यानंतर शरद पवारांनी  सामाजिक न्याय मिळून दिला. त्यांनी सर्व इतर मागास पुढारी, भटक्या विमुक्तचे पुढारी यांना मंत्रालयात बोलावले आणि भटक्या-विमुक्तासाठी स्वतंत्र जागा ठेवण्याचा निर्णय घेतला. मंडल आयोगाची अंबलबजावणी झाली. ७३वि घटना दुरुस्ती करून इतर मागासवर्गीयांना स्थानिक स्वराज संस्थेत प्रतिनिधित्व दिले. त्याचवेळी महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला. हिंदू कोड बिलातील दुरुस्तीमुळे सर्व भगिनी भावंडाच्या वडिलोपार्जित संपत्तीत वाटेकरी झाल्या. पुरोगामी  विचारांच्या शरदरावांनी स्त्री-पुरुष समानता, सर्व जातींना संधी हे विचार प्रत्यक्षात आणले. महात्मा फुले, डॉ.आंबेडकर यांची पुस्तके अल्प दारात जनतेला उपलब्ध करून दिली. श्रेष्ठ समाजसुधारकांच्या जीवन-विचारांवर परिश्रमपूर्वक चित्रपट काढले. एस.एम.जोशी, पु.ल.देशपांडे, कुसूमाग्रज अश्या व्यक्तींवरील चित्रपट ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान’ संस्थेकडून पूर्ण करून घेतले. यशवंतराव चव्हाणांना ते कधीही विसरले नाहीत. चव्हाणांच्या निधनानंतर कृतज्ञ भावनेतून त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान’ हे त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारले.
कृषी
२००९ ते २०१४ या कालवधीत शरद पवार कृषिमंत्री होते ,या वेळी सरकारने "एफडीआय'संदर्भात घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला. ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढून घेतला. पवार साहेबांनी मात्र या निर्णयाचे समर्थन केले. "एफडीआय'मुळे शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे अधिक पडतील असा विश्‍वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक स्वरूपाचा होता. कृषिमंत्री या नात्याने शरद पवारांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढली. अन्नधान्याचे उत्पादन विक्रमी ठरले. भारताचा शेतकरी पवार साहेबांना मसीहा मानतो. शेती पिकली तर शेतकऱ्याचे व देशाचे नशीब पिकेल, यात शंका नाही. 
क्रीडाप्रेम
कबड्डी, खो-खो या मराठमोळ्या खेळांची प्रगती त्यांच्यामुळे झाली. मल्लविद्येला आणि कुस्तीगीरांना त्यांनी उत्तेजन दिले. ते स्वतः गोल्फ उत्तम खेळतात. पुण्यातील बालेवडीची ‘श्री छत्रपती क्रीडानगरी’ त्यांच्यामुळे उभी राहिली. मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी वानखेडे स्टेडीयममध्ये सुधरणा केल्या. तिथे ‘क्रिकेट इंडिया’ची नवीन भव्य वास्तु उभी केली. ‘वांद्रे-कुर्ला संकुल’ निर्माण केले. उपनगरातील क्रिकेटप्रेमींना कांदिवली, मुलुंड येथेही छोट्या छोट्या अकादमी सुरु केल्या. निवृत्त खेळाडूंना त्यांनी निवृत्ती वेतन सुरु केले. माजी खेळाडूंचे निवृत्ती वेतन वाढवले. ते भारतीय क्रिकेट संघटनेनंतर आंतरराष्ट्रीय संघटनेचे (आयसीसी) अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटला अधिक उत्तेजन मिळाले.

व्यक्तिमत्वाचे विविध पैलू   
जागतिक मराठी परिषदेची स्थापना करून त्यांनी जगभरातील मराठी माणसे एकत्र केली. ‘यशवंतराव चौहान प्रतिष्ठाण’ हि राजकारण विरहित संस्था आहे. तिथे मराठी व इंग्रजी ग्रंथांचा उत्तम संग्रह आहे. चित्रपट, नाटक, कला, साहित्य, लावणी, तमाशा अशा विविध क्षेत्रातील कलावंतांचा तेथे सन्मान केला जातो. विविध क्षेत्रातील प्रश्नांवर तेथे चर्चा केली व परिसंवाद होतात. वेगवेगळ्या पक्षाचे व मताचे व्यक्ती तिथे एकत्र येतात. स्वतः शरद पवार बहुश्रुत असून त्यांना साहित्य-संगीत-कला व संस्कृती यात रस आहे. समाजाच्या भौतिक व वैज्ञानिक प्रगतीत तर त्यांना रस आहेच पण समाजाचे सांस्कृतिक जीवनही समृद्ध झाले पाहिजे असे त्यांना वाटते. उत्तमोत्तम ग्रंथांची मराठी भाषांतरे वाचकांना उपलब्ध व्हावीत, असे त्यांना वाटते. शास्त्रीय व सुगम संगीत त्यांना खूप आवडते. त्यांच्या प्रेरणेने ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ’ आणि ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ निघाले आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह अफाट आहे. बारामतीचा तर त्त्यांनी कायापालट केला आहे. शेतकी, फळबागा, पाझर तलाव याच्यासोबत एम.आय.डी.सी., विद्या प्रतिष्ठाण अश्या संस्थांमार्फात विकास झाला आहे. तेथे मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, मराठी व इंग्रजी माध्यमाचे पब्लिक स्कूल, महाविद्यालय, माहिती-तंत्रज्ञान, जीवशास्त्र, इंजिनिअरींग वगैरे शिक्षणाच्या सोयी, फिरता संगणक अशा अनेक सोयी उपलब्ध आहेत. मागील पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग १का कार्यक्रमात म्हणाले होते कि- ‘पवार यांनी बारामतीत जसा कायापालट केला आहे तसे देशातील प्रत्तेक गाव आणि शहराचे झाल्यास भारत आपोआपच प्रगत होईल.’ समाजाविषयीच्या  तळमळीमुळे आणि नेतृत्वगुणांनमुळे शरद पवारांनी हे करून दाखवले आहे.
ते ज्या-ज्या संस्थांचे पदाधिकारी आहेत, त्या-त्या संस्थेची प्रगती कशी होईल याचा आराखडा ते तयार करतात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, नेहरू सेंटर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, रयत शिक्षण संस्था, बॉम्बे क्रिकेट असोसीएशन, विद्या प्रतिष्ठान, कृषिविकास प्रतिष्ठाण, कोजेन इंडिया आशा विविध संस्थानचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थांचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी व्हावा असा त्यांचा कटाक्ष असतो. ते इतर राज्यात किंवा परदेशात जातात तेंव्हा अद्ययावत ज्ञान व माहिती घेऊन येतात आणि तिचा उपयोग आपल्या संस्थामध्ये करतात. ते दिल्लीत जरी असले तरी त्यांचे महाराष्ट्रावर सतत लक्ष असते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्या राज्याचे आणि देशाच्या ज्ञान अद्यावत कसे राहील यासाठी त्यांची सतत धडपड चालू असते. गवोगावच्या कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील माणूस भारावून जातो. आपल्या भेटीला येणाऱ्या प्रत्तेकाचे म्हणणे ते शांतपणे आईकून घेतात आणि मगच मतप्रदर्शन करतात. त्यामुळे ते लोकप्रिय आहेत. विविध पक्षातील नेत्यांशी तसेच कलाकार, साहित्यिक व वैज्ञानिक त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत.
विकास बारामतीचा
कॉलेज शिक्षण संपून शरदराव बारामतीला घरी परतले आणि १९६३सलि महाराष्ट्रात दुष्काळ पडला. बारामती तालुका दुष्काळी तालुकांपैकीच १ होता. नदी, नाले, विहिरी आतून गेल्या. पिण्याच्या पाण्यासाठीही आटापिटा करावा लागत असे. गोरगरिबांची उपासमार होऊ लागली. शरदरावांनी सरकार दरबारी प्रयत्न करून रेशन दुकानातून स्वस्त धन्य उपलब्ध करून दिले. परंतु लोकांकडे त्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी रस्त्याची कामे सुरु केली. दुष्काळावर मत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा विचार ते करू लागले. आपण जर पाणी अडवले आणि ते साठून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवली तरच दुष्काळाला तोंड देऊ शकू हे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी तेथे ‘युनेस्कोची फूड फॉर हंगर’ हि योजना राबवली जात होती. या योजनेत गरिबांना धान्य आणि पाम ऑईल दिले जात असे. शारदरावांनी त्यांच्या उनेस्कोच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जाऊन तेथील अधिकारऱ्याना विचारले “हे सर्व तुम्ही फुकट का देत आहात? ‘फूड फॉर हंगर’ हे आम्हाला अपमानास्पद वाटते. त्यैएवजि ‘फूड फॉर वर्क’ आशी योजना करा.” संचालक त्यांना म्हणाले ‘ तुम्ही हि योजना बारामतीत राबून दाखवा.’ शरदरावांनी ते आव्हाण स्वीकारले.
गावकऱ्यांच्या श्रमातून आणि मिशनच्या अर्थ सहाय्यातून ‘तांदुळवाडी’चा पहिला पाझर तलाव आकारास आला. पाझर तलावाच्या कामात येणार्यांना मजुरी म्हणून रोज ३ किलो गहू आणि आठवड्याला १ लिटर ऑइल देण्यात आले. ६ महिन्यात काम पूर्ण झाले आणि पहिल्याच पावसाळ्यात तलाव पूर्ण भरला. नंतर आसपासच्या परिसरात असे 300 तलाव बांधले गेले. ज्यादा पाणी वाहून नेन्यासाठी वेस्ट-वे करायला राज्य शासनाची मदत मिळवली.
शरदरावांनी बारामतीत ‘कृषी प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या मार्फत शेतकऱ्यांना  शेती विषयक ज्ञान देण्यात येऊ लागले. सावकाराच्या तावडीतून गरीब शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी ‘शेती विकास संघ-बारामती’ स्थापन झाला. त्याच्या मार्फत ट्युबवेल्स खोदण्यासाठी सेंट्रल बँकेकडून कर्ज मिळवण्यात आले. किर्लोस्कर कंपनीकडून सवलतीच्या दारात ऑइल इंजीन्स व पाणी खेचण्याचे पम्प शेतकऱ्यांना मिळून दिले. शेतीवर आधारित दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, वराहपालन असे जोड धंदे सुरु केले. संकरीत जनावरे पैदास केंद्र सुरु केले. १९६३साली बारामतीला शेतकरी परिषद भरवली. तिच्या उद्घाटनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. शरदरावांचा गौरव करताना ते म्हणाले, ‘ज्या पद्धतीने शारद्रवान्सारखे तरुण पुढे येतात व कामे करतात, ते पाहिल्यवर मला उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची चिंता राहिली नाही.’

नंतर शरदरावांनी अमेरिकेकडून जंगलवाढीसाठी मोठे आर्थिक साहाय्य मिळवले आणि काही वर्षातच उजाड माळराने आछादित झाले. फळबागा व उसाचे मळे निर्माण झाले. आप्पासाहेब पवार यांनी परदेशात जाऊन मिळवलेले शेतीविषयक ज्ञान बारामतीच्या विकासाला उपयुक्त ठरले. राहुरी कृषी विद्यापीठाने शेतीस संशोधनासाठी आप्पासाहेबांना डॉक्टरेट दिली. किर्लोस्कर, महेंद्र, गोयंका या उद्योगपतींनी बारामती परिसरात कारखाने सुरु केले. बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज दिले. अनेक बेकार तरुण स्वावलंबी झाले. तंत्रशाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, स्रियांसाठी कॉलेज, वसतिगृहे अश्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. माळेगाव सहकारी कारखाना, दुध डेअरी, भाताच्या गिरण्या यांनी बारामती तालुका गजबजला. फिरता दवाखाना सुरु झाला. शरदरावांनी बारामतीचा मोठ्या प्रमाणात कायापालट केला.
 
Top