कौटुंबिक पार्श्वभूमी  
          शरदरावांचे आजोबा जिजाबा हे शेतीवर उपजीविका करत असत . जीजाबांना गोविंदराव, गुलाबराव आणि ग्यानबा अशी तीन मुले होती. त्यापैकी गोइन्दराव हे शरदरावांचे वडील. उंच धिप्पाड शरीरयष्टी, सावळा रंग आणि उत्साही व्यक्तिमत्व. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. शेतीशिवाय ते बारामतीच्या खरेदीविक्री संघात काम करत होते. सहकार क्षेत्रातील जाणकार म्हणून लोक त्यांना ओळखत असत.
          शरदरावांची आई शारदाबाई ह्या कोल्हापूरच्या कृष्णराव भोसले यांची कन्या. गोविन्दारावांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांचा विवाह शारादाबाईशी झाला. लहान वयातच शारदेची आई मरण पावल्यामुळे त्यांचे बालपण मोठी बहीण व मेहुणे जाधव यांच्याकडे गेले. जाधवांची नौकरी फिरतीची असल्याने शारदा काही काळ शिक्षणासाठी पुण्याला सेवासदन मध्ये होत्या. त्यामुळे त्यांना पुणेरी संस्कृतीचा परिचय होता. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्या उदारमतवादी शिकवणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. साहावी- सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या शारदाबाईंना शिक्षणाबद्दल खूपच आस्था होती, १९२० साली त्यांचा व गोविंदरावांचा विवाह झाला. नौकारीमुळे गोविंदरावांना बारामतीला राहावे लागे. शारदाबाई शेतीची देखभाल करायला काटेवाडीला राहात होत्या. काटेवाडी बारामती पासून सहा मैलावर आहे. या दाम्पत्याला ७ मुले आणि ४ मुली झाल्या. सर्व भावंडे आरोग्यसंपन्न होती.
          शारदाबाईंनी मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष दिले. त्या स्वभावाने प्रेमळ, पण शिस्तप्रिय होत्या. त्यांनी मुलांएवढेच हक्क मुलीनाही दिले. त्यानंच्यावर उत्तम संस्कार केले. स्वावलंबन जातीभेदाबद्दल तिरस्कार, दिन दुबळ्यांबद्दल करुणा, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती मुलांमध्ये रुजवली पैशांपेक्षा चारित्र्य महत्वाचे आहे, असा मूलगामी संस्कार केला. १९३६ साली त्या पुणे जिल्हा लोकल बोर्डाच्या सभासद म्हणून निवडून आल्या. १९५२ पर्यंत त्या लोकल बोर्डावर काम करत होत्या. घरात त्यांच्या शब्दाला मान होता. त्यांनी मुलांना वाचनाची गोडी लावली. सर्व मुले आवडीने वृत्तपत्रे वाचत असत. घरात उत्तम लेखकांची पुस्तके आणली जात. वर्तमानपत्रातील लेखांवर घरात चर्चा होत असे. मुलांना सर्व जातीचे मित्र असत. ब्राम्हण मुलांशीही मैत्री असावी, असे त्या सुचवत असे. तुम्ही केवळ शेतीवर अवलंबून राहू नका, तुमचे आयुष्य स्वबळावर घडवा असे त्या मुलांना नेहमी सांगत असे.
शरद पवार
          शालेय वयात शरद अभ्यासापेक्षा खेळ, वक्तृत्व, पोहणे, वाचन, लोकसंग्रह या गोष्टींमध्ये जास्त रमतो आहे हे पाहून त्यांनी शरदला प्रवरानगरच्या हायस्कूल मध्ये पाठवले होते. तिथे त्याने गोवामुक्ती आंदोलनाच्या काळात शाळकरी मुलांचा मोर्चा काढून पोर्तुगीज सरकारचा निषेध केला होता.
          आमदार झाल्यानंतर पाच सहा महिन्यांनी १ ऑगस्ट १९६७ रोजी बारामतीच्या शाहू हायस्कूलमध्ये शरदरावांचा विवाह झाला. पुण्याचे क्रिकेटपटू सदाशिव गणपत शिंदे यांची जेष्ठ कन्या प्रतिभा त्यांच्या पत्नी झाल्या. त्या सुविद्य होत्या. हुंडा न घेता हे लग्न झाले. लग्नानंतरही आपण पूर्णवेळ राजकारण करणार आहोत आणि एकाचा आपट्याचे पितृत्व स्वीकारणार आहोत याची स्पष्ट कल्पना शरदरावांनी पत्नी प्रतीभाताईंना दिली होती आणि त्यांनी ती मान्य केली. १९६९ साली सुप्रिया ताईंचा जन्म झाल्यानंतर त्यांनी तो विचार प्रत्यक्षात आणला. प्रतीभाताईंनीही जिद्दीने एकत्र कुटुंबाची जाबाबदारी सांभाळली. मुलीवर उत्तम संस्कार केले आणि शारदरावांना उत्तम साथ दिली. पवार कुटुंबातील सर्व भाऊ, बहिणी, त्यांची मुले-बाळे, दिवाळीत चार दिवस काटेवाडीला एकत्र रहातात आणि कौटुंबिक जिव्हाळा जपतात. हे एक वैशिष्ट्यच आहे. सौ. सुप्रियाताई सुळे समाजकारणात रस घेताच होत्या. आता त्या खासदार होऊन वडिलांचा राजकीय वारसाही जपत आहेत.   

 
Top