ग. दि. माडगूळकर यांच्या वाङ्मयाचा माझ्या विचारसरणीवर मोठा प्रभाव पडलेला आहे. दरवर्षी दिवाळीला म्हणूनच बारामतीला शारदोत्सव हा संगीतोत्सव साजरा होतो. सध्या देशात सांस्कृतिक वातावरण प्रदूषित होत आहे; त्यामुळं सांस्कृतिक क्षेत्रात एक भीतीचं सावटही पडू लागलेलं आहे. खरंतर साहित्य-कला-संस्कृती हे विषय राजकारण्यांनी वर्ज्य मानू नयेत. या देशाचा कारभार करताना याचा विसर पडला तर अस्वस्थता वाढत जाते.
दिवाळीच्या दिवसांत आम्ही सगळे पवार कुटुंबीय बारामतीला असतो. माझ्या आईनं (शारदाबाईंनी) घालून दिलेली ही परंपरा आहे. एकतर आम्ही ११ भावंडं; त्यामुळं सदस्यांची संख्या वाढत राहिली. व्यवसायानिमित्त आणि कामानिमित्त भावांपैकी काहींचं वास्तव्य देशा-परदेशात होऊ लागलं. साहजिकच पवार कुटुंबात भर पडणाऱ्या या नव्या देशी-परदेशी सदस्यांची संख्याही मोठी झाली. दिवाळीच्या या चार दिवसांत ज्या बारामतीनं माझ्यावर संस्कार केले, मला प्रेम आणि आपुलकी दिली, त्यांच्यासाठी सांस्कृतिक भेट द्यावी, असं माझ्या मनात आलं.
अशा कार्यक्रमांसाठी बारामती इथल्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात एक सांस्कृतिक भवन निर्माण केले. माझ्या व्यक्तिगत जीवनात अनेक साहित्यिक, कलाकार, शास्त्रीय संगीतातले ज्येष्ठ गायक यांची संख्या मोठी आहे. या साहित्यिकांमध्ये (कै) ग. दि. माडगूळकर यांच्या साहित्याचा मी खूप वर्षांपासून चाहता आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष मैत्रीचं नातंही होतं; म्हणूनच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उभारलेल्या भवनाला गदिमांचं नाव देण्यात आलं. आजही माझ्या आठवणीत गदिमांची ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती’, ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’, ‘बुगडी माझी सांडली गं’, ‘आकाशासी जडले नाते धरणीमातेचे’ अशी एकाहून एक सरस गाणी आहेत. अनेक वर्षांपूर्वी म्हणजे बहुधा १९६७ मध्ये मी बारामतीतल्या ‘साने गुरुजी कथामाले’च्या रौप्यमहोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गदिमांना आमंत्रित केलं होतं. माझ्या मनात सांस्कृतिक क्षेत्राची ओढ तेव्हापासूनची आहे. त्यामुळं राजकारणाच्या जोडीनं समाजाच्या जडणघडणीत या सर्व साहित्यिक-कलावंतांना आपण जोडलं पाहिजे, असं मला वाटे. त्यामुळे मी आवर्जून गदिमा, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, ना. धों. महानोर, लक्ष्मण माने, नरुभाऊ लिमये, सुरेश भट अशा साहित्यिकांच्या भेटी नेहमीच घेत असे. गदिमांच्या वाङ्मयाचा माझ्या विचारसरणीवर मोठा प्रभाव पडलेला आहे. दरवर्षी दिवाळीला म्हणूनच बारामतीला शारदोत्सव हा संगीतोत्सव साजरा होतो. सध्या देशात सांस्कृतिक वातावरण प्रदूषित होत आहे; त्यामुळं सांस्कृतिक क्षेत्रात एक भीतीचं सावटही पडू लागलेलं आहे. खरंतर साहित्य-कला-संस्कृती हे विषय राजकारण्यांनी वर्ज्य मानू नयेत. या देशाचा कारभार करताना याचा विसर पडला तर अस्वस्थता वाढत जाते. म्हणूनच आजही मला गदिमांच्या ओळी आठवतात ः
नाना असोत भाषा, माझा विरोध नाही
प्रीतीस कोणतीही भाषा अबोध नाही
जो सद्विचार तो तो मज लक्षणीय आहे
मी भारतीय आहे
दिवाळी, नववर्ष अशा निमित्तांशिवायही आपण एरवीच्या काळातसुद्धा स्वतःचं माणूसपण जपण्यासाठी आपलं सांस्कृतिक संचित अबाधित राखणं महत्त्वाचं आहे.