मी शरद पवार


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा भारतीय राजकीय वर्तुळात अल्पावधीत अतिशय महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या मोजक्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे. भारतीय राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १० जून १९९९ रोजी १३ व्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना करण्यात आली. नेत्यांच्या कार्यक्षमतेमुळे कमी वेळात पक्षाने जनमत संपादन केले. पक्षाची चमकदार कामगिरी आणि जनमताचा कौल पाहून भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. नव्या राजकीय पक्षांची स्थापना आणि त्यांच्या विकासाच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वाटचाल आदर्श, अतुल्य आणि नवा पायंडा घालून देणारी ठरली आहे.

पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांतच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना पक्षाला सामोरे जावे लागले. देशात आणि राज्यांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पक्षाने आपले उमेदवार उभे केले. जनतेचा भक्कम आशीर्वाद मिळाला आणि राष्ट्रीय व राज्यपातळीवर एक समर्थ पक्ष म्हणून मान्यता मिळाली. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्येही ‘राष्ट्रवादी’ राज्यांच्या सत्तेत सहभागी झाली. गोवा, नागालँड, मेघालय, मणिपूर, आसाम, गुजरात, केरळ, बिहार, ओरिसा, झारखंड, अरुणाचल या राज्यांमध्ये पक्षाला जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. १५ वर्षांच्या प्रवासात निष्ठावान कार्यकर्ते आणि कर्तबगार नेत्यांच्या जोरावर केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागांतल्या नागरिकांशीही नाते जोडले आहे. विविध राज्यांपासून केंद्रशासित प्रदेशांपर्यंत देशाच्या सर्वच भागांत पक्षाने आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. अत्यंत अल्पावधीत निवडणूक आयोगाची राष्ट्रीय मान्यता मिळवून देशभर विस्तारलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा देशातील पहिला व एकमेव पक्ष आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि विकास या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून पक्ष अखंडित व प्रवाहीपणे आपले काम करीत आला आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्ध प्रभावीपणे संघर्ष करून मागासवर्गीय, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळावा यासाठी धोरणे आखून त्याच्या यशस्वी अमलबजावणीचे काम पक्षाने समर्थपणे पार पाडले आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘युवा धोरण’ जाहीर करून त्यांना सर्व क्षेत्रांत मोठ्य़ा संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार अविरत वाटचाल करणारा ‘राष्ट्रवादी’ हा देशातील एकमेव पक्ष आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद पवारसाहेब हे केंद्रात कृषिमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राला दुष्काळ, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटसमयी हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून वाटण्याकरिता उपलब्ध करून दिले. इतकेच नव्हे, तर राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक पाणलोट विकास, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण, मेगाफूड पार्क, मत्स्योत्पादन, दुग्धविकास यांसारख्या अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना फळबागा, ग्रीनहाऊस, शेततळी, सूक्ष्मसिंचन, अन्नप्रक्रिया उद्योग, छोटी यंत्रसामग्री, प्री-कूलिंग चेंबर्स, वातानुकूलित वाहने, गोदामे, आधुनिक रायपनिंग चेंबर्स, बाजारांची उभारणी, कांदाचाळीसाठी अनुदान, शेतमालाच्या निर्यातीसाठी सबसिडी, मासेमारी, पशुपालन, दुग्धव्यवसाय यांसारख्या कितीतरी गोष्टी व त्याकरिता लागणारे अनुदान नवनवीन योजना सुरू करून उपलब्ध करून दिले. ४२ वस्तूंच्या आधारभूत किमतीत त्यांनी प्रचंड वाढ करून दिल्यामुळे लाखो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात पडू शकले. त्यामुळे शेतकरीवर्गात प्रचंड समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते, हे कोणालाही विसरता येणार नाही. देशाच्या अन्नधान्य स्वयंपूर्णतेइतकीच शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीही महत्त्वाची आहे, हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मा. श्री. शरद पवारसाहेब यांनी कृतीतून सिद्ध केले आणि गेली ५० वर्षे अनुत्तरित असलेल्या एका प्रश्नाचे उत्तर जाहीरपणे दिले आहे, त्यामुळे ‘शेतकऱ्यांचे प्रेषित’ याच भावनेतून लोक त्यांच्याकडे आज पाहत आहेत.

धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे. देशाची समता, सामाजिक न्याय, एकता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी हे पक्ष वचनबद्ध आहे. रोजगार, निवारा, अन्न, शिक्षण, आरोग्याच्या अधिकाधिक उत्तम सुविधा देऊन देशातल्या सामान्य नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रयत्नशील आहे. रोजगाराच्या संधी निर्माण केल्यास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिल्यास देशाच्या स्थायी अर्थिक विकासाला हातभार लागेल आणि त्याचा लाभ समाजाच्या दुर्बळ घटकांना होईल, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा दृढ विश्वास आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक लोकशाहीची स्थापना करणे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या माध्यमातून नागरिकांचा सन्मान आणि देशाची एकता जपणे ही पक्षाची आधारभूत तत्त्वे आहेत. कोणत्याही भेदांशिवाय, पूर्वग्रहांशिवाय विविध धर्मांच्या अनुयायांमध्ये असलेला बंधुभाव, एकमेकांच्या धर्मांचा आदर, परस्पर सहकार्य आणि सलोखा म्हणजे धर्मनिरपेक्षता, असे आम्ही मानतो.

समता आणि सामाजिक न्याय म्हणजे समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी विशेष सकारात्मक पावले उचलणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांत मुख्यत्वे शिक्षण आणि कौशल्य विकासात समान संधी मिळवून देणे. धार्मिक, जातीय, सामाजिक, प्रादेशिक, लिंगाधारित किंवा सामाजिक स्थानावर आधारित कोणतेही भेद न करता कायद्याचे राज्य आणणे, हे या पक्षाचे ध्येय आहे. श्रम आणि प्रतिष्ठा परस्परपूरक ठरले पाहिजेत. देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बांधील आहे. शांतता, प्रगती, एकतेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास साधणे ही आमची विकासाची व्याख्या आहे.


ष्ट्रीय कार्यकारिणी समिती

राष्ट्रीय फ्रंटल संघटना

राष्ट्रीय मदत निधी समिती

सर्व राज्यांचे राज्यप्रमुख / अध्यक्ष

लोकसभा सदस्य

राज्यसभा सदस्य

प्रदेश पदाधिकारी

प्रदेश फ्रंटल संघटना

महाराष्ट प्रदेश जिल्हाध्यक्ष

निरीक्षक यादी

विधानसभा सदस्य

विधानपरिषद सदस्य

 
Top